---|| राजे ||---

Monday, October 25, 2010

---|| वढू - तुळापुर - संभू राजांच्या चरणी ||---



 पहाटे ६ वाजता शास्त्रीनगर - येरवडा येथून रवाना झालो ,
कोरेगाव-भीमा येथून डाव्या बाजूला काही अंतरावर वढू-बुद्रुक लागते.
पहाटे ६:४५ ला वढू-बुद्रुक मध्ये संभाजी राजांच्या समाधी स्थळी पोहचलो,
समोर संभू राजांची मूर्ती पहिली नी पावले तिकडे आपसूक वळली,
संभाजी राजांच्या भव्य - तेजोमय अश्या पुतळ्याचे दर्शन घेवून
आम्ही समाधी कडे वळलो .पहाटेची वेळ असल्याने तेथील संभू राजांची
पूजा करण्यासाठी "भोसेकर " नावाची व्यक्ती आली होती, येतील कोणी ना कोणी रोज संभाजी राजांची पूजा करतात.
आम्ही त्यांच्याशी ओळख करून घेतली, आणि आम्हाला
पूजा करण्याचा मान मिळाला . संभाजी राजांच्या समाधी स्थळी
पाणी वाहताना संभाजी राजांनी धर्मासाठी केलेले बलिदान आठवले ,
त्यांच्या समाधीस स्पर्श करताना अंग थरथरले, मन स्थब्द झाले.
काही वेळ तेथेच बसून राहिलो. काही वेळाने त्यांच्या भव्य
अश्या पुतळ्यास हार घालून त्यांचे  चरण स्पर्श केले .
त्यानंतर कवी कलस यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
भोसेकर यांच्या कडून तेथील चाललेल्या कामाची माहिती मिळाली .
तटबंदीचे काम चालू होते, तसेच संभू राजांचे चरित्र शिल्प रुपात बनवण्याचे
काम चालू आहे, हे सर्व काम लोकवर्गणीतून चालू आहे , त्यामुळे अजून २ वर्षे
तरी काम पूर्ण होण्यास लागतील. संभाजी राजांच्या समाधीचे दर्शन घेवून
आम्ही ८ वाजता तुळापुर कडेरवाना झालो .  लोणीकंद मधून आतमध्ये
७-८ किलोमीटर वरती तुळापुर लागते, आम्ही तिथे पोहचलो. तिथे प्रवेश करताच
आम्हाला तिथे बनविलेली बाग दिसली आणि आतमध्येच उपहार गृह दिसले,
जे तिथे नको होते. तेथील संभू राजांची समाधीचे दर्शन घेतले, बगिच्यामुळे नी
उपहार गृहामुळे समाधी स्थळाचे वेगळेपण हरवले आहे.
तेथूनच त्रिवेणी संगम पाहायला मिळतो. तिथेच संगमेश्वरचे मंदिर आहे.
तेथे दर्शन घेवून आम्ही आमच्या परतीच्या वाटेकडे रवाना झालो.








Friday, October 1, 2010

---|| राजमाता जिजाऊ साहेबांना मनाचा मुजरा ||---

महाराष्ट्राच्या मातीत आणि या मातीतल्या माणसांच्या मनात आणि आचरणात ज्यानं स्वाभिमान आणि स्वातंत्र्य पेरलं, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात ते स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच बीज ज्या आईने पेरलं, ती आई म्हणजे जिजाऊसाहेब. त्यांना फक्त शिवबांच्याच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राच्या आई म्हणाव लागेल, म्हणूनच राष्ट्रमाता आणि राजमाता हे नाव जिजाऊ साहेबांना अगदी शोभते. काही शतकांनंतर सुद्धा छत्रपतींचे विचार किती सद्य परिस्थितीला साजेशे वाटतात. सामाजिक समता, मानवी हक्क, स्त्रियांचा हक्क, सर्वांसाठी समान न्याय आणि अनेक मानवी मुल्यांचा आदर करणारे विचार, जे छत्रपतींच्या आचरणात होते, आपण म्हणू शकतो या आईनेच त्यांना दिले; त्यासाठीचे वातावरण आणि संस्कार जिजाऊ साहेबांनी शिवरायांना दिले. हा सह्याद्रीचा राजा, सहयाद्री सारखाच कणखर आणि अंगाई सारखा दयाळू व मायाळू या आईच्या पदराखालीच झाला. पुढे छत्रपतींच बाळ, बाळराजे, धर्मवीर संभाजी महाराज ही याच कुशीत आणि संस्कारात वाढले.

याच आऊसाहेबांची साथ शहाजी राजांना होती, ज्यांनी स्वराज्याच स्वप्न जिजाऊ साहेबांसोबत पाहिलं; जिजाऊनी ते छत्रपतींकडून साकार करून घेतलं.[या वाक्यानं छत्रपती परप्रकाशित होत नाहीत; आणि तो उदेष्य ही नाही. कोणत्याही बाळाच्या यशात त्याच्या आईच्या संस्काराचा सिंहाचा वाटा असतो आणि राजे स्वयंप्रकाशित सूर्य होते, ज्याला सदैव तितक्याच तेजाच्या आईचे मार्गदर्शन लाभले]

स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची साक्षात भवानी, एका सुर्याइतक्या तेजस्वी आणि सहयाद्री सारख्या कणखर आणि खंबीर असलेल्या युगपुरुषाची माता, धर्मवीर आणि ज्ञानवीर छत्रपती संभाजी राजांची आजी आणि आऊ असलेल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांना मनाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम. 

संदर्भ  : http://rajmatajijau.blogspot.com/2010/02/blog-post.html
==========================================================================

---|| सेनापति सरनोबत हाम्बीररावांस पत्र ||---

"क्षत्रिय कुलवंतस श्री राजा शंभू छत्रपती प्रती

सरनोबत, सरलष्कर हंबीरराव मोहिते दंडवत उपरी,

मामासाहेब नात्याने आम्हीही आपले भाचे आहोत. भोसले आणि मोहिते घराण्याची सोयरिक् तर गेल्या तीन पिड्यांची .

आबासाहेबानी तुमच्या मस्तकावर सेनापतिपदाचा मन्दिल काय म्हणून ठेवला? सोयराबाई साहेबांचे बंधू म्हणून नव्हे ,

तर महाराजाना महाप्रतापी प्रतापराव गुजरांची जागा भरून काढायला एका रतनाची आवश्यकता होती .

आता थोरले महाराज गेले, आम्ही सारे पोरेके जाहालो ! योग्य तो निर्णय घेण्याइतके आपण सुद्न्य आहात मामासाहेब ---

उपरी आधिक काय लिहाव ? अंतर ना पडू द्यावे ही प्रार्थना "

============================================================================
 
"क्षत्रिय कुलवंतस श्री राजा शंभू छत्रपती प्रती राजश्री हंबीरराव मोहिते सरनोबत, सरलष्कर
तिर्थरुप आबासाहेबांचे महानिर्वाण जाहाले, आमच्या मस्तकावर अस्मानच फुटले. एशा कालकोपमधे एकच गोष्टा चांगली म्हणायची.
तीन मासामागे पन्हळगडि तिर्थरुप आबासाहेबानची दिर्घ भेट घडोनि आली. त्यांचे सहवासे सलग चार पाच रोज बहूत मसलति जाहल्या. मनातल्या आंदेशांचा आणि किन्तुपरंतु चा निचरा झाला. आम्हाकडून मोगलाईकडे निघून जाण्याचा आविवेकही आबासाहेबांनी पोटात घातला तिर्थरूपांचे काळीजच डोंगराएवढे. माफिही केली आणि मोगलांविरुध नव्या आघाडीची कामगिरीही त्यांनीसांगितली. तिर्थरूपांचे अवचित जाण्याची जखम खूप दांडगी . आठवाणे अजूनही डोळे गळतात. याउपरिही श्री कृपेकरून पुन्हा कंबर कसून खडे राहण्याचा आमचा मन्सुबा पक्का आहे. परंतु काही द्रष्ट कारभा-यांच्या आणि स्वार्थी मानत्यांच्या चाली तिरक्या आहेत. दिलामधे खोट. बालके राजारामांना गादीवर बसवण्याचा घातकि विचार ते मातोश्री सोयराबाईंच्या डोक्यात भरवतात. स्वार्थापोटी राजघराण्यात बखेडा करू बघतात. मामासाहेब राजारामाप्रमाणे आम्ही आपले सख्खे भाचे नसु, पण हिंदवी स्वराज्य निर्माण कर्त्या शिवाजीचे बाळ आहोत. त्या पापी औरंगजेबाचा एक दिवस काळ ठरू. आज राज्यापुढच्या वाटा निसरड्या. पल्ला दांडगा गाठायचा मन्सुबा आहेच. एशा वख्तास आपलाही हात द्याल तर संकटाचा दर्या सहज पार करू. हातून गलति घडल्यास आवश्य कान पिळायला आपुला अधिकार.
औरंगजेब पातशहा खूप माजला आहे. जिझीया कराचे हत्यार आपूल्या मस्तकी मारू चाहतो. राजश्री आबासाहेबांचे जे संकल्पित होते, ते चालवावे हेच आम्ही अगत्य जाणोन कारभार करितो, आशीर्वाद असु द्यावे, जाणिजे, लेखनाळंकार. .
संदर्भ :-
http://www.marathiadda.com/profiles/blogs/2437740:BlogPost:154199