---|| राजे ||---

Saturday, March 30, 2013

---|| शिवजयंती १९ फेब्रुवारीलाच ||---

हो आम्ही शिवजयंती तारखेनुसार म्हणजे १९ फेब्रुवारीलाच साजरी करतो...कुणाला काही प्रश्न असतील त्यांनी न वाद घालता खालील पोस्ट अवश्य वाचावी...

छञपती शिवराय महाराज यांची जन्मतिथी ही १९ फेब्रुवारी १६३०  ही असुन त्यासंबधी संदर्भ खालीलप्रमाणे
1) जेधे शकावली -इ स १९०८ च्या सुमारास जेधे शकावली दाजीसाहेब जेधे देशमुख यांच्याकडुन उपलब्ध झाली,त्यातिल नोँद "शके १५५१ शुक्लनाम संवत्सरे फाल्गुन वद्द तृतिया शुक्रवार नक्षञ हस्ता घटी १८ पळ ३१ गंड 5 पळे ७ ये दिवशी राजश्री शिवाजी राजे शिवनेरीस उपजले"

2) तंजावरचा शिलालेख-१८०३ मध्ये राजेभोसले वंशावळीचा शिलालेख आहे त्यात देखिल शक १५५१ असाच उल्लेख आहे.

3)परमानंदक्रत संस्क्रत भाषेतील शिवभारत-तंजावर येथील सरस्वती महाल palace ग्रंथालयसंग्रहालय तंजावर हस्तलेख बी १४०९ या क्रमांकावर शिवभारत ग्रंथाची नोँद आहे,यात तिथी सांकेतिक शब्दात सांगितलेली आहे-"भूबाण प्राण चन्द्राब्दै : सम्मिते शालिवाहने| शके संवत्सरे शुल्के प्रव्रत्तेचोत्तरायणे||२६|| शिशिरर्तो वर्तमाने प्रशस्ते मासि फाल्गुने | कृष्ण  पक्षे त्रतीयायां निशि लग्ने सुशोभने || २७ || अनुकुल तरै स्तुंग संव्प्रयै: पचंमिर्ग्रहै: | व्यजिताशेष जगती स्थिरसा साम्राज्य वैभवम्|| २८ || ....सुषुवे साभ्दुदे सुतम || ३१ || याचा मराठी अनुवाद "शालिवाहन शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरे उत्तरायणात शिशिर ऋतू  मध्ये फाल्गुन वद्ध ञतियेला राञी शुभलग्नावर ,अखिल पृथ्वीचे साम्राज्य वैभव व्यक्त करणारे पाच ग्रह अनुकुल व उच्चीचे असताना तिने अलौकिक पुञ रत्नास जन्म दिला"

4) शिवभारताची तामिळ भाषेतील नक्कल-इ स १९१८ मध्ये इतिहास संशोधक श्री स म दिवेकर याना तंजावर येथील सरस्वती महाल लायब्ररीत शिवभारत नावाच्या एका ग्रंथाची ताडपञावर लिहिलेली तामिळ भाषेतील प्रत मिळाली,त्यातिल जन्मतारिख जेधेशकावली व शिवभारत यातिल तारिख तंतोतंत उतरते

5) व्यावर(राजपुताना) जन्मकुंडली- इ स १९२५ मध्ये श्री गौरीशंकर हीराचंद ओझा यानी राजस्थानात व्यावर येथे मिळालेल्या एका जुन्या जन्मपञिका संग्रहातील शिवराय महाराजांची जन्मपञिका उजेडात आणली,ब्यावर येथिल निवासी मिठालाल व्यास याचे वंशज ज्योतिषी चंडु यांच्या जुन्याबाडात मिळाली,तिचा लेखक शिवराम ज्योतिषी हा छञपती शिवराय महाराज यांच्या समकालीन होता,त्यात "सवंत १८६६ फाल्गुन वद्द 3 शुक्रे ऊ घटी ३०/९ राजा शिवजन्म र १०/२३ ल ४/२९" अशी आहे,हे देखिल शिवभारताशी जुळते...


---|| अमोल काटे ||---

संदर्भ :- http://www.facebook.com/photo.php?fbid=261091140694120&set=at.108010469335522.10820.100003797078821.1474527579&type=1&theater

---|| शिवजयंती तारखेनुसार म्हणजे १९ फेब्रुवारीलाच साजरी ||---

शिवजयंती ही तारखेनुसार का ?


कुळवाडी भूषण छत्रपती शिवराय यांचा जन्मोत्सव हा तारीख प्रमाणे करणारे सर्व शिवभक्तांचे हार्दीक शिवअभिनंदन जय जिजाऊ .......... आता तिथ...ीप्रमाणे शिवजयंती साजरे करणारे भरकटलेले शिवभक्त यांना शिवरायांचा जन्मदिवस हा तारीख प्रमाणे का करावा ? या बाबत शंका निरसन करीत आहे. छत्रपती शिवराय हे जगाच्या पाठीवर प्रसिध्द असलेले राजे आहे यात शंकाच नाही. इंग्रजी कालगणना हि इसवी 1 पासून
सुरु झाली व आज तगायत 2013 पर्यंत चालू आहे आणि चालू राहणार यात शंका घेण्याचा वाव नाही. जगाच्या पाठीवर कोटयावधीच्या संख्येमध्ये शिवभक्त आहे. हे सर्व शिवभक्त जिवापेक्षाही जास्त छत्रपती शिवरायांवर प्रेम करतात. या शिवभक्तांना दिशाहिन करण्यासाठी काही मंडळी शिवजयंती ही तिथी प्रमाणे साजरा करण्याबाबत आग्रह धरतात. या मध्ये त्यांचे शिवप्रेम नाही अस नाही पण ते छत्रपती शिवराय
यांना पंचागामध्ये बंदिस्त करु इच्छीतात. जगाच्या पाठीवर पंचाग मानणारे प्रदेश किंवा देश किती आहेत ? माझ्या मते नेपाळ आणि भारत (यामध्ये सुध्दा बहुधर्मिय असल्याने 100 टक्के माणनारे नाहीत )हे हिंदू राष्ट्र संकल्पना जतन करणारे देश आहेत. त्यामुळे ते पंचाग मानतात. छत्रपती शिवराय हे जागतिक किर्तीचे महामानव होते. त्यांची किर्ती सर्व जगात पसरलेली आहे. शिवजयंती हि केव्हा साजरी करावी याबाबत जगाच्या पाठीवर परदेशात असणारे शिवभक्त यांना सतत संभ्रम निर्माण व्हावा. त्यांची एकजूट होवू नये यामुळेच शिवजयंती हि तिथीप्रमाणे करण्याबाबत आग्रह धरतात ही सत्य परिस्थीती आहे असे माझे मत आहे. शिवरायांनी 350 पेक्षा जास्त किल्ले बांधले , आरमार उभे केले परंतु केव्हांही पंचाग पाहिले नाही किंवा सत्य नारायण केला नाही. या शिवाय छत्रपती शिवराय यांची आई राजमाता
जिजाऊ यांची जयंती देखील 12 जानेवारी ला साजरी केली जाते . शहाजी राजे यांची देखील इंग्रजी कॅलेंडर प्रमाणेच जयंती साजरी केली जाते. इंग्रजी कॅलेंडर हे जगमान्य आहे आणि छत्रपती शिवराय हे देखील जागतिक किर्तीचे राजे होते. त्यामुळे सर्व शिवभक्तांनी तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी न करता तारीख प्रमाणेच म्हणजे 19 फेब्रुवारी ला करावी. आणि तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यास सांगणारे शिवभक्त हे ते मानत असलेल्या महामानवचा जन्म दिवस तिथीप्रमाणे का करत नाही ? याबाबत देखील त्यांना विचारावे म्हणजे त्यांना तेच योग्य उत्तर देतील . शेवटी शिवभक्तांचा निर्णय हा अंतिम आहे.पुन्हा एकदा शिवभक्तांना विनंती कि छत्रपती शिवराय यांच्या दोन जयंत्या करुन राजांची थट्टा थांबवावी.
छत्रपतींचा जन्मोत्सव जर जागतिक दर्जाचा बनवायचा असेल तर आपणास जगमान्य असलेल्या कॅलेंडर नुसार तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करावी लागेल. सर्व शिवभक्तांना पुन्हा एकदा आवाहन शिवजयंती हि तारखे प्रमाणेच करावी . जय जिजाऊ...............जय शिवराय.

शिवश्री रिजवानभाई पानसरे
पुणे जिल्हा कार्याध्यक्ष :- विर भगत सिंग विद्यार्थी परिषद्